Events

मतीतल्या खेलांची जत्रा


01/12/20


*एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया घेऊन येत आहे...* *“मातीतल्या खेळांची जत्रा”*   चला तर मग आपल्या बालकाच्या संगतीने खेळुयात मातीतले खेळ अगदी विनामूल्य..! देशी खेळ म्हटल्यानंतर डोळ्यांसमोर मातीतील खेळ उभे राहतात. त्यामध्ये गोट्या, विटी-दांडू, लंगडी, लगोर,भोवरा ,टायर फिरवणे असे विविध देशी खेळ आणि यांचे वैशिष्टय़ म्हणजे याला एकही रुपयाची गुंतवणूक लागत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे खेळ खेळले जातात. प्रशिक्षक नसतानाही केवळ बघून ती मुले हे खेळ खेळतात. बालकाच्या मनावर खेळाची आवड कोणी बाहेरून लादलेली नसते; तर ती स्वयंस्फूर्तच असते. ही उपजत आवड मुलाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही. त्याला काहीतरी हालचाल करायलाच लावते. जी हालचाल प्रिय, ती हालचाल मूल वारंवार करते. तसेच प्रौढांचे अनुकरण करण्याची प्रवृत्तीही मुलांमध्ये जात्याच असते. या हालचालीतून व अनुकरण-प्रवृत्तीतून खेळाचा जन्म होतो. अशा रीतीने क्रीडेकडे मुलांची स्वाभाविक ओढ असते. क्रीडा ही सर्जनात्मक सहजप्रवृत्तीतून निर्माण होणारी नैसर्गिक क्रिया आहे. प्राणिमात्रांमध्ये ती कमीअधिक प्रमाणात दिसून येते. शिकण्याची वृत्ती अधिक असलेल्या प्राण्यांत क्रीडाप्रवृत्तीही अधिक दिसते. क्रीडेतील निर्माणक्षमता ही आनंददायी असते. त्याचमुळे आबालवृद्ध खेळात रमतात. कर्तृभाव म्हणजे कर्तृत्व गाजवण्याची इच्छा, ही मुलांना खेळाकडे खेचत असते. खेळ म्हणजे मुलांच्या शिक्षणाची निसर्गाने केलेली व्यवस्थाच होय. मुलांची वाढ त्यांच्या खेळावरच अवलंबून असते. खेळ हे मनाच्या व शरीराच्या निरोगीपणाचेच लक्षण होय. खेळापासून त्यांना परावृत्त केले की, ती स्वाभाविक चिडखोर, तुसडी व एकलकोंडी बनतात. मूल खेळत नसेल तर ते निरोगी नाही, त्याच्यात जन्मजात विकृती आहे, असे मानसशास्त्र मानते. (एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती.) . *स्थळ: शारदा प्रांगण, बारामती* *रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत*