Events

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने 190 बाटल


08/30/20


एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने 190 बाटल्या रक्त संकलित.... कोरोनाच्या पार्श्वभूमी मुळे रक्तदात्यांनी ब्लड बँकेकडे पाठ फिरवली त्यामुळे शहरातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता याचा विचार करून आणि ब्लड बँकेच्या आव्हानात प्रतिसाद देत येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांनी तीन दिवस रक्तदान शिबीरांचे आयोजन करत तब्बल 190 बाटल्या रक्त गोळा केले. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार फोरमचे कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराने या विधायक उपक्रमात सक्रीय सहभाग दिला. आज बारामती क्लब येथे एन्व्हॉर्यमेंटल फोरम तसेच मंगेश ओमासे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 151 बाटल्या रक्त गोळा करण्यात आले. युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्या अगोदर शहरातील स्व. माणिकबाई चंदुलाल रक्तपेढीत सलग दोन दिवस झालेल्या रक्तदान शिबीरात फोरमच्या सदस्यानी 39 बाटल्या रक्त गोळा केले. दरम्यान याच रक्तपेढीत व बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कमध्येही रक्तदान शिबीराचे आयोजन फोरमच्याच वतीने केले जाणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. रक्ताचा तुटवडा भासू नये व गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे त्या म्हणाल्या. बारामती ब्लड बँकेतून थॅलेसिमिया सारख्या दुर्धर आजार असलेल्या अनेक रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जातो तसेच सध्या बारामतीसह इतर 100 किलोमीटरच्या परिघात असलेल्या रुग्णालयाकडून रुग्णांसाठी वारंवार रक्त तसेच प्लेटलेट्स यांचा डेंगू सदृश्य आजार ,अपघात ,या आजारांसाठी सतत मोठ्या प्रमाणात मागणी होत असते मात्र कोरोना सारख्या संकटाला सामोरे जात असताना ब्लड बँकेत मात्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता याचा विचार करत आणि बारामती आणि परिसरात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत