बारामती- एन्व्हॉर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या ७ व्या वर्धपन दिना निमित्त दि. १३ मार्च २०१७ रोजी चिराग गार्डन बारामती येथे स्नेह मेळावा व बारामती आयकॉन पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीच्या नावलौकीकात भर घालणा-या १) डॉ. कीर्ती पवार, कार्य :- किटकनाशके पिऊन आत्महात्येचा प्रयत्न करणा-या रुग्णांवरील उपचार प्रणालीवर संशोधन व क्रिटिकल केअर मेडिसिन या विषयावर यंग सायंन्टीस्ट पुरस्कार प्राप्त, तसेच लॉनसेट या जगप्रसिध्द मेडिकल जनरल मध्ये शोधनिबंध प्रसिध्द झाल्याचा मान मिळवणा-या तालुका पातळीवरील भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. २) श्री. प्रल्हाद (आबासाहेब) परकाळे, कार्य :- गेली ३० वर्षे पासुन बारामती शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थींना संगित मार्गदर्शन व आध्यापन. ३) सौ. निर्मला जाधव व श्री. काशिनाथ जाधव. कार्य :- अनेक वर्षेंपासुन आदिवासी भागातील नागरीकांना व विद्यार्थींना दैनंदिन वापरातील वस्तुंचे मोफत वाटप. ४) डॉ. राणी भगत व प्रा. श्री. राजकुमार देशमुख कार्य :- जगाला ज्ञात नसलेली एक वनस्पती इरीओ कॉलन बारामतीकम या नावाने प्रजातीचा शोध.व याच बरोबर बारामतीतील एक अतिदुर्मिळ वनस्पती जगा समोर आणली. या व्यतिरीक्त दोन नविन वेगळ्या वनस्पतींचा महाराष्ट्रराज्या साठी नव्याने शोध. या सर्वांना बारामती आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले गेले.