एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ़ इंडियाचा वर्धापन दिन हा चिराग गार्डन, भिगवण रोड, बारामती, येथे दणक्यात पार पडला. .. याप्रसंगी पर्यावरण व सामाजिक जाणीवेचे भान ठेवत फोरमच्या मार्गदर्शक आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संकल्पनेतुन बारामतीतील सर्व उद्यानामध्ये फोरमच्या वतीने विविध पक्षी ,प्राणी, वृक्षांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार असुन प्रतिनिधीक स्वरूपात बारामतीचे नगराध्यक्ष व नगरसेवकानंच्या उपस्थितीत वरील माहितीपर एक बोर्ड सुपुर्द करण्यात आला . तसेच सद्या दुष्काळाचे सावट असुन पण पाणी टंचाई आहे यामुळे पाणी काटकसरीने वापरावे पाण्याचा अपव्यय टाळावा या साठी फोरमच्या वतीने पाणी बचाव पर जनजागृती पर संदेश देणारे पोस्टर्स चे अनावरण केले गेले. तसेच येणारा उन्हाळ्य व नंतरचा पावसाळ्यात पक्षांची निवार्यची सोय म्हणुन फोरमच्या वतीने पक्षासांठी घरटी वाटप करण्यात येणार असुन ज्या कोणास हि घरटे हवे असेल त्यांनी Evfindia.org या संकेत स्थळावर जाऊन आपला फॅर्म भरून नाव नोंदणी करण्याचे आव्हान करण्यात आले . तसेच कार्यक्रमामध्ये निसर्गाचे वैविध्यपूर्ण असे फोटो चे प्रदर्शन होते. सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उद्योजक, शासकीय अधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी,महिला संघटनांचे पदाधिकारी , कार्यकर्ते ,युवक वर्ग, कलाक्षेत्रातील , मीडिया प्रतिनिधी, असे बरेच जण उपस्थित होते. यासर्व मान्यवरांनी फोरम वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा दिल्या. !!!