दरवर्षी उन्हाळ्यात एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यातील वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय केली जाते.. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय.. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण होतेय.. ही बाब लक्षात घेवून अधिकाधिक जागी पाण्याची सोय केली जात आहे. आज बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार परिसरात जराडवाडी आणि अमृतवाडी येथील वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये वन्यजीव प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले....